!doctype>
शुक्रवार, 12 मई 2023
आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन
गुरुवार, ११ मे ते मंगळवार १६ मे या सहा दिवसांच्या कालावधीत पहाटे व रात्री या स्पेस स्टेशनचे दर्शन होणार आहे. हे स्पेस स्टेशन दरताशी सूमारे २८हजार किलोमीटर या वेगाने साधारण ४०० किलोमिटर अंतरावरून पृथ्वी भोवती फिरत असल्याने ते जेव्हा आपल्या भागात येते तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो. स्थान परत्वे त्याच्या तेजस्वी पणात,वेळात व दिशेत बदल होत असतो. ११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल.
गुरुवार ११ मे रोजी रात्री ७-१३ते ७-१६ या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जाताना दिसेल. ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहील्यानंतर पुन्हा रात्री ८-४८ ते ८-५१या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस हा आकाश नजारा बघता येईल. १२ मेच्या पहाटे ५-०२ते ५-०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल. याच दिवशी रात्री ७-५९ ते ८-०६ यावेळी अधिक प्रमाणात प्रकाशताना नैॠत्य ते ईशान्य आकाशात बघता येईल. १३ मे रोजी पहाटे ४-१३ ते ४-१८ या वेळी उत्तर पूर्व बाजूला आणि रात्री ७-११ ते ७-१७ या वेळी नैॠत्य ते ईशान्य आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल. पुन्हा १४ मे रोजी पहाटे ५-०१ ते ५-०८ या वेळात वायव्य ते आग्नेय आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल.पुन्हा याच दिवशी रात्री ८ ते ८-०४ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. १५ मे रोजी पहाटे ४-१३ ते ४-१९ या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री ७-११ते ७-१६ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. १६ मे रोजी जरा पहाटे ३-२९ ते ३-३० या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे ५-०२ ते ५-०६यावेळी पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल. असा हा सहा दिवसांचा अनोखा आकाश नजारा आकाश प्रेमींनी पहावा.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें