आकाश आणि अवकाश

आकाश आणि अवकाश



आकाश आणि अवकाश हे दोन्ही बहुदा एकाच गोष्टीची दोन नावे असतील अशी एखाद्याची समजूत होईल. परंतु मुळात ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.



सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातील धूळ आणि निरनिराळे वायू त्यांचे विकिरण करतात (म्हणजेच मार्ग बदलतात). ह्या प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट प्रकारचे वायू सूर्य किरणांमध्ये असलेल्या सात रंगापैकी बहुतेक रंग शोषून घेतात. फक्त निळ्या रंगाचेच शोषण जास्त न होता ते पृथ्वीवर येतात. हा निळा रंग वातावरणामध्ये पसरल्याने आपणास वातावरण 'निळसर'दिसते. ह्याच 'निळसरवातावरणास आपण 'आकाशअसे म्हणतो.



रात्रीच्या वेळेस सूर्यप्रकाश नसतो. अशा वेळेस आपण पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील विश्व आपण पाहत असतो. विश्व अनंत आहेकारण अद्याप आपणास विश्वाची सीमा कळलेली नाही.



रात्रीच्या वेळेस आपणास अनेक तारे दिसतात. हे सारे विश्वाच्या पोकळीमध्ये पसरलेले आहेत. रात्रीच्या वेळेस डोळ्यांना दिसणारी पोकळी म्हणजे 'अवकाश'.



थोडक्यात सांगायचे तर पृथ्वीवरून दिवसा दिसणारे 'आकाशतर रात्री दिसणारे 'अवकाश'.



आकाशाला मर्यादा आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या अंतरापर्यंत त्याची मर्यादा आहे. तर अवकाश अनंत आहे. आपल्या डोळ्यांना दिसणारे अवकाशातील तारे हे ठराविक अंतरापर्यंत आहेत. परंतु दुर्बिणीने पाहिल्यास त्या पलीकडचे तारे देखिल आपणास दिसतात. विश्वाच्या पोकळीत अनंत दूर अंतरापलीकडेही तारे व आकाशगंगा आहेत. परंतु त्यांना पाहण्यासाठी आपली दृष्टी मर्यादित आहे. म्हणजेच अवकाश अनंत आहे.






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें