ABL साहित्य

➖➖➖♏💲🅿➖➖➖

        *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*


    🍀🍀🍀🌺🌺☘☘🍀


        *पर्यावरण स्नेही शाळा*

              ===========

   

      ♻ *उपक्रम*:-


♻ *ABL चा प्रभावी वापर!-*



ABL म्हणजे Activity Based Learning ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )

 

  *अध्ययनाचे ६ टप्पे : -*


वि. अध्ययन कार्ड सोडवत असताना त्याला १ mileston पूर्ण करण्यासाठी ६ टप्प्याने फिरावे लागते. कार्डवरील लोगो पाहून तो वि. योग्य त्या गटात बसून अध्ययन करतो. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ६-६ अध्ययन थाळ्या (समूह थाळ्या) आहेत.


   *वेळापत्रक व गट कसे करावे : -*


   शाळेचा पट, शिक्षकसंख्या व वर्गखोल्या यांचा विचार करून ABL चे गट /वेळापत्रक करावे लागते. सर्व गटात साधारणपणे सर्व स्तरातील वि.येतील असे नियोजन करावे. वेळापत्रक करताना दररोज किमान 2 मुख्य विषयांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे.


    *दिवसभराची कार्यवाही : -*


       ABL राबवत असताना सकाळ सत्रात परिपाठनन्तर 30 ते ४0 मि. साईड ladder वरील त्या महिन्यातील कृती घ्यावी. या कृतीत त्या वर्गातील सर्व वि.सामूहिकरीत्या सहभागी होतील.(गाणी,गोष्ट,कविता)

       त्यांनतर मुख्य २विषयांचे सव्वा ते दीड तासांचे प्रत्येकी अध्ययन होईल. दुसऱ्या सत्राच्या शेवटी पुन्हा ३०ते४०मी विषयानुसार सामूहिक कृती घ्यावी.

सत्र पूर्व व सञोत्तर कृती ह्या आपापल्या वर्गात सामूहिकरीत्या घेणे अपेक्षित आहे.


  *ABL अध्ययन  पद्धतीचे  फायदे : -*


१ वि. स्वतःच्या गतीने व क्षमतेने शिकतो.


२ वि .ला दिवसभरात २ विषयांचे अध्ययन करावे लागत .


३ वि. प्रत्यक्ष कृती करून शिकत असल्याने अध्ययन प्रभावी व परिणामकारक होते.


४सराव व दृढीकरणाला भरपूर वाव आहे.


५ वि.ने अध्ययन केलेल्या घटकवरच परीक्षा(चाचणी)असते. त्यामुळे परीक्षाचा ताण नसतो.      

  

६ हसत खेळत ,मनोरंजनातून शिक्षण होते.


७ वि.सतत कार्यमग्न राहतो.


८ वि.चा सर्वांगीण विकास होतो.   

                          

८ वि.एका वर्षात एकापेक्षा जास्त इयत्तांचा अभ्यास करू शकतो.


९ सहकार्याची भावना वाढीस लागते.


           *श्री.जाधव रविराज*

       *जि.प.प्रा.शाळा खेर्डा बु*

           *ता.गेवराई जि.बीड*


♻♻♻♏S🅿♻♻♻


   *चलो यवतमाळ*

*महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे*

*तंत्र- ज्ञान -रचनावादी तंञस्नेही संमेलन*


☄☄☄Ⓜ💲🅿☄☄☄

ABL डाउनलोड

ABL डाउनलोड

Activity Based Learning ही अध्ययन पद्धती
खूपच परिणामकारक आहे. ABL पद्धतीने
विद्यार्थ्यांना
अध्ययन करायला खूप सोपे, मनोरंजक होते.
इयत्तानिहाय ABL पद्धत डाउनलोड करण्यासाठी

खालील लिंकवर आपण भेट देऊ शकतात

इयत्ता 1ली



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें