सोमवार, 13 मार्च 2017

जलद प्रगत महाराष्ट्र

*दि.13 मार्च 2017*

*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा*
--------------------------------------------
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा
 घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक *दि.04 मार्च 2017 रोजी* सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .


माहिती भरण्याची लिंक
                 
                                       
                                        CLICK




सदर माहितीची सद्यस्थिती वर इमेज फाईल  मध्ये जिल्हानिहाय व एक्सेल फाईल   ( आपण सदर एक्सेल फाईल इथून डाउनलोड करु शकता - DOWNLOAD )मध्ये जिल्हा, तालुका , केंद्र निहाय माहिती प्राप्त शाळा स्थिती दर्शविलेली आहे.


*सातारा, अहमदनगर, परभणी, नाशिक, पालघर, हिंगोली, जालना जिल्हा वगळता अद्याप एकही जिल्ह्याची 50% पेक्षा जास्त माहिती आलेली नाही.*


 *गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर,सांगली, धुळे, नांदेड, बीड, मुंबई(उपनगर),यवतमाळ हे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे व शाळांचे सदर माहिती उपलब्ध करून देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, व  याबाबत मा. आयुक्त शिक्षण यांनी नाराजी व्यक्त केली आहे*


आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत अवगत करून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळा हि माहिती भरतील याबाबत सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

दि.15 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.

*- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें